Aai Ani Wadil
आई-वडील"
"आई- वडील" म्हणजे नक्की काय असतं?
आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं,अँडव्हान्स पाठबळ असतं...!!!
तुमच्या
प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं तुमच्या जन्मापासून
त्यांच्या मरण्यापर्यंत त्यांनी आपल आयुष्य खर्चलेलं असतं...!!!
"आई" तुमच्या आयुष्याच्या गाडीच योग्य दिशा देणार "स्टीयरिंग"
असतं...!!!
तर अचानक आलेल्या संकटात सावरायला, "वडील" म्हणजे "अर्जेंट ब्रेक" चा पर्याय असतं...!!!
"आईच प्रेम" हे रोजच्या आयुष्यात कामाला येणार "बँक बॅलन्स" असतं...!!!
तर "वडील" म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस किंवा "व्हेरिएबल पेमेंट" असत...!!!
"आई" म्हणजे, तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलच "नेटवर्क" असतं...!!!
आणि कधी "नेटवर्क" थकले; तर "वडील"
अर्जंट "SMS" असतं...!!!
"आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातलं "अँटीव्हायरस" असतं...!!!
तर शोधून काढलेले व्हायरस संपवायचं "वडील" हे "क्वारनटाईन" बटण असतं...!!!
"आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातलं "शिक्षणाच विद्यापीठ" असते...!!!
तर "वडील" म्हणजे चालती बोलती अनुभवाची फॅकटरी असते...!!!
"आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातली साठवलेली पुण्याई असते...!!!
तर "वडील"
म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते...!!!
"आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातला मागर्दशर्क गुरु असतो...!!!
तर दाखवलेल्या वाटेवर "वडील" हा जवळचा मित्र असतो...!!!
"आई" म्हणजे साक्षात भगवंत, परमेश्वर असतो...!!!
तर त्या परमेश्वरापर्यंत पोचवणारा "वडील" एक संत असतो...!!!
"आई" म्हणजे तुमचे शरीर,मेंदू, हृदय आणि मन असतं...!!!
तर "वडील"
म्हणजे भक्कम ठेवणारा पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं...!!!
कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य "आई गंSSS" असतं...!!!
आणि भले मोठे संकट आले की उच्चारात "बाप रे बाप" असतं...!!!
परमेश्वर समोरआला तरी उभे राहायला वीट फेकलेल पुंडलिकाच मन असतं...!!!
त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं...!!!
म्हणूनच
म्हणतो...
परमेश्वर, अध्यात्म, भगवंत हे सगळ अजब गणित असतं...!!!
त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं "आई- वडील" हे कनेक्शन असतं...!!!
"आई- वडील" म्हणजे नकळत मागे असलेली मायेची सावली असतं...!!!
उगाच नाही आपल्या संस्कृतीत "मातृ देवो भव" अन् "पितृ देवो भव" म्हणलेलं असतं...!!
No comments:
Post a Comment