माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता
काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता।
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता।।।धृ।।
कशी ऊन्हात तळतात माणसं।
कशी मातीत मळतात माणसं।
कशी खातात जिवाला खस्ता।
माझ्या गावाकडं चल माझ्या
दोस्ता।।१।।
काळ्या बापाचं हिरवं रानं।
काळ्या माईनं पिकवलं सोनं।
पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता।
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता।।२।।
ईथं डब्यात तुला साखर लागतीया गोड।
तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड।
पण भाव ठरतो त्याला न पुसता।
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता।।३।।
जवा दुष्काळ घिरट्या घाली।
तवा
गावाला कुणी न वाली।
कसं सुगीत घालतात गस्ता।
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता।।४।।
या भुमिचा मुळाधिकारी।
बाप झालाय आज भिकारी।
गाव असुन झालाय फिरस्ता।
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता।।५।।
काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता।
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता।।
No comments:
Post a Comment