Showing posts with label आलो आहे आता मी मनसोक्त भिजून घे. Show all posts
Showing posts with label आलो आहे आता मी मनसोक्त भिजून घे. Show all posts

Wednesday, 2 July 2014

आलो आहे आता मी मनसोक्त भिजून घे

आलो आहे आता मी मनसोक्त भिजून घे



आलो आहे आता मी
मनसोक्त भिजून घे

पुन्हा लिही कविता माझ्यावर
हातात ती लेखणी घे


कोसळत्या सरींबरोबर
भाजक्या मक्याचा आस्वाद घे

छत्री दे भिरकावून
अन् हवं तेवढं बागडून घे


चिखलातून चालताना
पँट थोडी सावरून घे

घरी पोहोचायला उशीर होईल
रेल्वेचं कोलमडणं सांभाळून घे
गॅलरित बस निवांत
काॅफी आणि कांदाभजी घे

वाफांचं आणि सरींचं काँबिनेशन
समजत असेल तर समजून घे
असेल नसेल कोणी सोबत
तर त्यांनाही सामावून घे

भिजण्याची आवड नसेल
पण थोडं इतरासाठी भिजून घे
छप्पर गळेल घराचं
ताडपत्रीवर तोंडसुख घे

माझ्या कोसळण्याचे बोल
मलाच लावण्याचंही सुख घे
पुन्हा मी निघून जाईन
हवं तेवढं ओंजळीत भरून घे

वर्षभर साठवून ठेवायचंय तूला
आज मात्र थोड्यावरंच भागवून घे...!!!