Showing posts with label प्रेम म्हणजे काय. Show all posts
Showing posts with label प्रेम म्हणजे काय. Show all posts

Thursday, 19 June 2014

प्रेम म्हणजे काय

प्रेम म्हणजे काय


प्रेम म्हणजे काय ....!!!
दोन देह एक श्वास म्हणजे
प्रेम....
मनातील नाजूक कळी म्हणजे
प्रेम....
सुवासिक सुंदर फुल म्हणजे
प्रेम....


हृदयातील निशब्द भावना म्हणजे
प्रेम.....
पहाटेचे सोनेरी स्वप्न म्हणजे
प्रेम....
किनार्यावरील बेधुंद वारा म्हणजे
प्रेम....
हळुवार जपणारा फुलपाखरू म्हणजे
प्रेम....
ती नसताना जवळ असल्याचा भास म्हणजे
प्रेम....


तिचा निरागस स्पर्श म्हणजे
प्रेम....
ओठावरील अबोल भावना म्हणजे
प्रेम....
जणू अप्सरेची एक झलक म्हणजे
प्रेम....
तिला रोज पाहण्याची ओढ म्हणजे
प्रेम....
पौर्णिमेच्या चंद्राचा शीतल प्रकाश म्हणजे
प्रेम....
शांत मनातील सुखद स्वर म्हणजे
प्रेम....
हृदयाचा न चुकणार ठोका म्हणजे
प्रेम....
वर्तमानात घडणारा इतिहास म्हणजे
प्रेम....
आनंदाचा सुखद सहवास म्हणजे
प्रेम....
अनोळख्या व्यक्तीशी ओळखीचे नाते म्हणजे
प्रेम....
आयुषभर हवी असणारी साथ म्हणजे
प्रेम....
तिचे माझ्या स्वप्नातील अस्तित्व म्हणजे
प्रेम....
तिच्यासाठी घडणारी हि कविता म्हणजे
प्रेम.... प्रेम.... प्रेम....