Showing posts with label मुंबई मुंबई मुंबई तिथे आहेतरी काय?. Show all posts
Showing posts with label मुंबई मुंबई मुंबई तिथे आहेतरी काय?. Show all posts

Friday, 11 July 2014

मुंबई मुंबई मुंबई तिथे आहेतरी काय?

मुंबई मुंबई मुंबई तिथे आहेतरी काय?


मुंबई मुंबई मुंबई तिथे आहेतरी काय?

८ रूपयाला वडापाव आणि १० रुला चाय.
आला पाहुणा घरी तर आखडून बसायच पाय.
आणायची १०० रु. किलोची चिकन. सांगायच
... बोकडाच मिळतच नाय.
अहो पगार कमी सांगुन इज्जत
गमवायची नाय.
मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय?


सकाळी सकाळी 7:30 वाजता उठायच.
बिना तोंड धुता खिडकित यायच.
शेजारच्या पोरीला collegeला जाताना
हळूच म्हणायच, हाय.
तीने रागात पाहिल तर
म्हणायच सुंदर माझी ताय
मनातल्या मनात एक शिवी घालून बोलायच
राँग नंबर लागला की काय
अहो मुंबई मुंबई मुंबई तिथ आहे तरी काय??


रिक्षाची भीड़ , गल्ली बोलातल रस्ते
बाइक वाल्यांची किर किर,
फेरीवाल्यांची दादागिरी,
सडलेली कोथिम्बिर,
कच्च कुच्च वडापाव,
आणि पानी पूरी खाऊन
पर प्रांतीयांनाच म्हणायचे भाय
अहो मुंबई मुंबई मुंबई तिथेआहे तरी काय??
पाण्यासाठी पळायच , गॅससाठी रांगा
कामाला जाण्याइतकं अगोदरच
फैक्ट्री चा वाजतो भोंगा.
धावत धावत टाकाव्या लागतात
ट्रेन मधे ढेंगा.
ट्रेन मधल्या गर्दित
आपण असतो आतमधे
आणि बाहेरच लटकतात पाय.
दादा मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय??
काही ही असुद्यात
पण करोडो कुटुम्बाची पोशिंदा ती
तीच आमची ताय आणि तीच आमची माय
आमच्या मुंबई चा आम्हाला आभिमान हाय
आहो मुंबई मुंबई मुंबई
म्हणजे आहे तरी काय
गरिबाच पोट आणि दुधावरली साय....