Showing posts with label Garbha. Show all posts
Showing posts with label Garbha. Show all posts

Saturday, 1 November 2014

Garbha

Garbha


    !! गर्भ !!
किती मंद तो प्रकाश तुझ्या गर्भामध्ये होता.
स्वर्गातला तो काळ माझ्या भोवताली होता.
एकटाच मी अन माझं जग तूच होतीस.



या भयाण जगापासून मला लपवून तू होतीस.
तुझ्या हृदयाचा आवाज किती मधुर तो होता.
तुझ्या प्रत्येक स्पंदनावर माझा छोटा जीव होता.
तुला मला जोडणारी एक कोमल दोर आत होती.
तुझी नाळ ती जणू वेल मला लपटलेली होती.
तुझा आवाज येता ओठ माझे हसायचे.
कान माझे फक्त तुझ्या आवाजाला तरसायचे.



माझ्यासाठी तू स्वतःला किती किती जपायाचीस.
एक मी जगावं म्हणुनी किती किती तू मरायाचीस.
जन्म मला देताना किती सोसले तू त्रास.
पण मी जगावं फक्त हाच तुझा ध्यास.
गर्भातले ते महिने पुन्हा येणार नाही.
पण मी तुझ्याशिवाय जगू शकणारच नाही... हे आई!!
माझी आई...