Showing posts with label Swabhawacha Aushadh. Show all posts
Showing posts with label Swabhawacha Aushadh. Show all posts

Saturday, 1 November 2014

Swabhawacha Aushadh

Swabhawacha Aushadh



स्वभावाला औषध असतं
पण ते रोज घ्यायच असतं..


अधिरातला "अ" सोडून
थोड धिरानं घ्यायच असतं



संतापातला ताप सोडून
मनाला संत करायच असतं


मनातला हट्ट सोडून
नातं घट्ट करायच असतं


आपलं बोलणं सोडून कधी
समोरच्याचही ऐकायच असतं 



एकाच दिवशी नाही तरी
हळू हळू बदलायच असतं


थोडं थोडं जमल तरी
रोज प्रेम द्यायच असतं


स्वभावाला औषध असतं
पण ते रोज घ्यायच असतं...