Showing posts with label Tu atta Purvisarkha Rahilas Nahi. Show all posts
Showing posts with label Tu atta Purvisarkha Rahilas Nahi. Show all posts

Sunday, 11 May 2014

Tu atta Purvisarkha Rahilas Nahi

Tu atta Purvisarkha Rahilas Nahi

मी कसा होतो ते तिला पूर्ण माहित होतं
जसा होतो तसा तिला आवडत होतो
बरं चाललं होतं एकुणात आमचं
मग कधीतरी ती म्हणाली
मला तुझं 'हे हे' आवडत नाही
तिला आवडत नाही म्हणून
मी 'हे हे' करणं बंद केलं



मग काही दिवसांनी ती म्हणाली
तू 'ते ते' करतोस ना त्याचा मला राग येतो
मग मी 'ते ते' करणंही बंद केलं
मग सगळं बरं चाललं असताना
अचानकच ती म्हणाली
तुझं 'अमुक अमुक' मला अजिबात मान्य नाही…
झालं… मी 'अमुक अमुक' सोडून दिलं
अन मग पुन्हा काही दिवसांनी म्हणाली
एकदम आईडियल आहे रे आपलं आयुष्य
फक्त तुझं ते 'तमुक तमुक' सोडलं तर…
झालं… मी 'तमुक तमुकही' सोडून दिलं…


आता खूप खूप दिवसांनी
मी माझं ‘हेहे', ‘तेते', 'अमुक अमुक', ‘तमुक तमुक'
सारं सारं तिच्या सांगण्यानुसार
सोडून दिल्यावर आणि बंद केल्यावर
ती म्हणते आहे,
‘तू आता पूर्वीसारखा नाही राहिलास रे…'
आता बोला…!!