Sunday, 21 December 2014

Ayushya

आयुष्य 


आयुष्यभर सोबत असून,
जवळ कधी बसत नाही,
एकच घरात राहून आम्ही,
एकमेकांस दिसत नाही,



      हरवला तो आपसातला,
      जिव्हाळ्याचा संवाद,
      एकमेकांस दोष देऊन,
      नित्य चाले वादविवाद, 





धाव धाव धावतो आहे,  
दिशा मात्र कळत नाही,  
ह्रदयाचे पाऊल कधी,
ह्रदयाकडे वळत नाही, 



     इतकं जगून झालं पण,
     जगायलाच वेळ नाही,
     जगतो आहोत कशासाठी,
     काहीच कशाला मेळ नाही,





क्षण एक येईल असा,  
घेऊन जाईल हा श्वास,  
अर्ध्यावरच थांबलेला,  
असेल जीवन प्रवास,



       अजुनही वेळ आहे,
       थोडं तरी जगून घ्या,
       सुंदर अशा जगण्यला,
       डोळे भरून बघुन घ्या...

Tea Or Cofee

चहा…! की कॉफी…!!



चहा म्हणजे उत्साह..

कॉफी म्हणजे स्टाईल..!

चहा म्हणजे मैत्री..

कॉफी म्हणजे प्रेम..!!


चहा एकदम झटपट..

कॉफी अक्षरशः निवांत..!

चहा म्हणजे झकास..

कॉफी म्हणजे वाह मस्त..!!




चहा म्हणजे कथा संग्रह..

कॉफी म्हणजे कादंबरी..!

चहा नेहमी मंद दुपार नंतर..

कॉफी एक धुंद संध्याकाळी.!!


चहा चिंब भिजल्यावर..

कॉफी ढग दाटुन आल्यावर.!

चहा = discussion..

कॉफी = conversation..!!


चहा = living room..

कॉफी = waiting room..!

चहा म्हणजे उस्फूर्तता..

कॉफी म्हणजे उत्कटता..!!




चहा = धडपडीचे दिवस..

कॉफी = धडधडीचे दिवस..!

चहा वर्तमानात दमल्यावर..

कॉफी भूतकाळात रमल्यावर..!!


चहा पिताना भविष्य रंगवायचे..

कॉफी पिताना स्वप्न रंगवायची..!!

Pahila Prem

Pahila Prem



एकदा गावी जाण्यासाठी
एस टी मध्ये बसलो
सीटवरती बसताना
मनामधीच हसलो....

सीट होतं दोघांचं
एकटी होती लडकी
जवळ तिच्या बसलो की
दिल मे आग भडकी...



माझ्याकडे पाहून
ती गालात हसली
मला वाटलं नक्कीच
ती आता फसली...

रंगाने होती गोरी
चेहर्‍यावरती हसरे भाव
तिला पटवण्याचा माझ्या
मनाने केला उठाव...

एस टी थोडी आदळली की
तिचा स्पर्श व्हायचा
श्रावणातल्या सरींची
आठवण करून  द्यायचा...

बसण्यात थोडं अंतर होतं
ते पण आता सरलं
बघता बघता एसटी ला
अंधारानं घेरलं....

अंधाराचा फायदा घ्यावा
असं मला वाटलं
विचारांचं काहूर
मनात माझ्या पेटलं....



काय बोलावं तिच्याशी
काहीच कळत नव्हतं
मनात यायचं बोलावं
ओठांवरती वळत नव्हतं...

कुणी इकडं बघतं का
पहात होतो जवळपास
ती वाटायची पारो
मी तिचा देवदास...

मी मग ठरवलं
तिच्याशी आता बोलायचं
मनातलं प्रेम
तिच्यापाशी खोलायचं...

मी बोलणार इतक्यात
तिने काढला "खाऊ"
हळूच म्हणाली थोडासा
खाता का हो "भाऊ"....

त्याचदिवशी ठरवलं
"प्रत्येकीवर" नाही मरायचं
पहिलं प्रेम आता
"बायको" वरच करायचं...

BachPan

BachPan



Ek bachpan ka zamana tha, 
jisme khushiyon ka khazana tha; 


chahat chand ko paane ki thi, 
par dil titli ka deewana tha.




Khabar na thi kuch subah ki, 

na shaam ka  thikana tha; 


thak haarke aana school se,
par khelne bhi jaana tha.


Maa ki kahani thi, 
pariyon ka fasana tha;  

barish mein kagaz ki naav thi, 
har mausam suhana tha.



Har khel mein saathi the,  
har rishta nibhana tha; 

gum ki zuban na hoti thi,  
na zakhmon ka paimana tha.

Rone ki wajah na thi,
na hansne ka bahana tha; 


kyon ho gaye hum itne bade, 
isse achha to
woh bachpan ka zamana tha.........

Kon Bolto

कोण म्हणतो लग्नाच्या गाठी,
देव स्वर्गात बांधत असतो.



जन्मोजन्मीचं वैर काढत..
तो दिवसरात्र तिच्याशी भांडत असतो,
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी,
देव स्वर्गात बांधत असतो.


लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस लग्नानंतर राहत नाही,  
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.




मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,  
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो..  
आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.


आपला नवरा बैल आहे,
असं प्रत्येक बाईला वाटत असतं..  
त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख  
तिच्या मनात दाटत असतं,


त्याचा तो गबाळा अवतार..  
तिला नीट्नेटकं राहयचं असतं.
तिला चार दिवस सासूचे..  
तर त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं.




लहान मोठ्या चाकाचा 
हा संसाराचा रथ पळत कसला, रांगत असतो,
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.


ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल,  
असं प्रत्यक्षात घडत नाही. त्
याच्या स्वप्नाचे पंख लावून,
ती त्याच्या आकाशात उडत नाही.


तो गच्चीत तिला घेऊन जातो,
इंद्रधनुष्यावर चालायला..
ती सोबत पापड कुरड़या घेते,  
गच्चीत वाळत घालायला.


त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची  
लखलखती शुक्राची चांदणी असते,  
हिच्या डोक्यात गोडा मसाला  
आणि वर्षभराची भाजणी असते.


आपली बायको म्हैस आहे,  
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो.  
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी  
देव स्वर्गात बांधत असतो.

Khara prem kai asta

 Khara prem kai asta 


प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आई रात्री उशापाशी येते
आणि बोलते
बाळा झोप राहिलेला अभ्यास उद्या कर


. ... प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण घरी उशिरा येतो आणि वडील
बोलतात बाळा उशीर होणार होता तर
एखादा फोन तरी करायचास.





. प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण एखाद्या मुलीशी फोनवर बोलत असतो  
आणि वाहिनी बोलतात
ओय हिरो एखादी मुलगी वगैरे पटवली कि नाही

. प्रेम तेंव्हा असते  
जेंव्हा छोटी बहिण बोलते  
बघ हा दादा माझ लग्न झाल ना 
मग बघते कोण तुझ काम करेन ते

.  


प्रेम तेंव्हा असते जेंव्हा 
आपला मूड खराब असतो  
आणि तेवढ्यात आपला मोठा भाऊजवळ येवून बोलतो
हे नाटक्या चल कुठेतरी फिरून येऊन

.
 प्रेम तेंव्हा असते  
जेंव्हा एखाद्या जुन्या मित्राचा call येतो 
आणि तो बोलतो
ये खजूर मेलास कि जिवंत आहेस अजून  
हे खर प्रेम... . . .  

खरच तुमच्या जीवनात हे क्षण वाया घालवू नका
प्रेम म्हणजे फक्त एक मुलगा आणि एक मुलगी नसते.

Shala

|| शाळा ||




तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
शाळेमधी जायाचो अन पाटी-दप्तराच ओझ,
पाठीवरती वाह्याचो.......|| धृ ||

घर माझ शाळेपासून, होत लई दूर.....!  
प्रार्थनेला उशीर झाला की, गुरुजी करायचे कुरकुर.....!   
 मग हिवाळा असो कि उन्हाळा,
मी अनवाणीच पळायचो   ......||१||


  तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
  शाळेमधी जायाचो......!!

माय माझी मजुरीच्या, कामावरती जायाची.....!  
शाळेमधी चटणी-भाकर, बांधून फडक्यामधी द्यायची.....!
 मग दुपारच्या सुट्टीत मी, ती आवडीन खायाचो .......||२|| 



 



          



     तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
     शाळेमधी जायाचो......!!

नाही विचारलं कधी कुणी मला, तुला शाळेत काय येत......!  
तरी जवळ घेऊन माय म्हणायची, लेकरू माझ शाळेमधी जात......!
लाड-लाड मग मी तीला, चार-आठ आणे मागायचो......||३||


       तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
      शाळेमधी जायाचो......!!

आठवड्याच्या बाजारातून आईन मला, एक सदरा अन चड्डी घेतली होती.......!
 रोज-रोज तीच-तीच घालून, ती नको तिथ फाटली होती......!
तरी मी तीला मोठ्या, आवडीने घालायचो.....||४||


       तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
       शाळेमधी जायाचो......!!  

गुरुजी माझे लई कडक, त्यांची शिस्त होती भारी.......!
नजरेच्या धाकानेच नुसती, मुले गप्प बसायची सारी.......!
तरी नजर चुकवून त्यांची, मुला-मुलिंची खोडी काढायचो.......||५||
          
       तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
       शाळेमधी जायाचो......!!

खेळ खेळतांना अशी, ताकद अंगात यायची.....!
आट्या-पाट्या नि विटी-दांडूची, रंगत वाढत जायची......!  
कधी व्हायचा रडीचा डाव, मग एकामेकासंगे भांडायचो......|| ६||


       तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
       शाळेमधी जायाचो......!!

रविवारची सुट्टी तर, भारीच मला आवडायची.....!  
गाई-म्हशी चारतांना, चिंचा नि बोरे खायाची......!  
नदी मधल्या खोल डोहात, मनसोक्त पोहायचो......|| ७|| 


       तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
       शाळेमधी जायाचो......!!

गण्या,सुक्या,मोहन्या शाम्या, माझे मित्र होते कोळ्याचे.....!  
मासे धरतांना ओले कपडे, नेहमी अंगावरच वाळायचे.....!
माशासंग खेकड्याच्या नांग्या, नदीलाच भाजून खायाचो......||८|| 




     तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
     शाळेमधी जायाचो......!!

पाचवीत गेल्यावर मला, नवीन भाषा इंग्रजी आली......!  
तेव्हा पाढ्यासारखी घोकून-घोकून, ए-बी-सी-डी पाठ केली......!  
कधी-कधी यू नंतर व्ही एवजी व्ह्यू म्हणायचो, अन छडीचा मार खायाचो......||९||

       तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
       शाळेमधी जायाचो......!!

परीक्षा जवळ आली की, माझ्या पोटात यायचा गोळा......!
 गुरुजी म्हणायचे नेहमी, मुलांनो अभ्यास करून खेळा......!
 समजून अस सांगतांना, त्यांच्यात मी माझी माय पाहायचो......||१०||


       तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
       शाळेमधी जायाचो......!!

पूर्वी सारखे नाही राहिले आता, शिक्षण आणि शाळा......!
 नवनविन धोरणांनीच घोटलाय, आज विद्यार्थ्यांचा गळा......!  
इतक हसत खेळत शिकलो तरी, चांगल्या मार्कांनी पास व्हायाचो....||११||


       तुमच्या सारखाच मी ही गड्यांनो,
       शाळेमधी जायाचो......!
       अन पाटी-दप्तराच ओझ,
       पाठीवरती वाह्याचो.......|| धृ ||