Monday 11 August 2014

AAjkalcha Jeeevan

AAjkalcha Jeeevan


जाग येता पहिल्या प्रहरी
हळुवार डोळे उघडावे...१

मग पाहून मोबाइलकडे
व्हॉट्सअपला स्मरावे...२
अंथरुणातून उठताक्षणी
फेसबुकला पहावे...३



समोर फक्त पोस्ट्स
आणी पोस्ट्सलाच भजावे...४
सर्व आन्हिके झाल्यावर
पुन्हा मोबाईलचरणी बसावे...५
चार्जिंग करून त्याचे
त्यालाच सर्व अर्पावे...६
घरांतून निघता बाहेर
जवळ त्यालाच ठेवावे...७
त्याची खात्री करून घेतल्यावर
मगच घर सोडावे...८



क्षणभर दाराबाहेर थांबून
नोटिफिकेशन चेक करावे...९
ऑनलाइनची खात्री करून
मगच मार्गस्थ व्हावे...१०
24x7 मोबाईल, नेहमी
जवळ बाळगून चालावे...११
येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
विशेष न पहावे...12
सगळ्या ग्रुप्स मध्ये
आपण ऍक्टिव राहावे...१३
सतत काही ना काही
कॉपी-पेस्ट-फॉरवर्ड करावे...१४
जीवन हे 'मोबाईल' आहे
नेहमी लक्षात असावे...१५
प्रत्येक पोस्ट हेच जीवन
हेच मनी ठसवावे...१६
एडमिन चे शिकवणे हे
सतत ध्यानी धरावे...१७
फेसबुक-व्हॉट्सऍप वर राहून नेहमी
जीवन आपुले जगावे...
जीवन आपुले जगावे...

No comments:

Post a Comment