Sunday 21 December 2014

Kon Bolto

कोण म्हणतो लग्नाच्या गाठी,
देव स्वर्गात बांधत असतो.



जन्मोजन्मीचं वैर काढत..
तो दिवसरात्र तिच्याशी भांडत असतो,
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी,
देव स्वर्गात बांधत असतो.


लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस लग्नानंतर राहत नाही,  
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.




मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा,  
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो..  
आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.


आपला नवरा बैल आहे,
असं प्रत्येक बाईला वाटत असतं..  
त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख  
तिच्या मनात दाटत असतं,


त्याचा तो गबाळा अवतार..  
तिला नीट्नेटकं राहयचं असतं.
तिला चार दिवस सासूचे..  
तर त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं.




लहान मोठ्या चाकाचा 
हा संसाराचा रथ पळत कसला, रांगत असतो,
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो.


ती थोडी तरी त्याच्यासारखी वागेल,  
असं प्रत्यक्षात घडत नाही. त्
याच्या स्वप्नाचे पंख लावून,
ती त्याच्या आकाशात उडत नाही.


तो गच्चीत तिला घेऊन जातो,
इंद्रधनुष्यावर चालायला..
ती सोबत पापड कुरड़या घेते,  
गच्चीत वाळत घालायला.


त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची  
लखलखती शुक्राची चांदणी असते,  
हिच्या डोक्यात गोडा मसाला  
आणि वर्षभराची भाजणी असते.


आपली बायको म्हैस आहे,  
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो.  
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी  
देव स्वर्गात बांधत असतो.

No comments:

Post a Comment