Saturday, 1 November 2014

Malvani Kavita


Malvani Kavita


"गावपण"इसरान आम्ही,
घातलौ विकासाचो घाट.
पायार धोंडो मारून सोताच्या,
लावलौ सगळी वाट.



डायनिंग टेबला इली घरात,
रव्हले पुजेपुरते पाट
सोरकुल, मडके वांगडा संपलो,
उभ्या पंगतींचो थाट.

ग्यासची गाडी गावात इल्यार,
धरली चुलीनी वाट
मसनीत कपडे धुतल्यापासून,
आता दुखना नाय पाठ.

बजेटमधे बसले फ्रीज
आणि फुटान गेले माठ
एसी पंखे दिसले थयसुन
मेल्या वाऱ्याकच लागली नाट.



बाईर पंप जोडल्यापासून,
शाप गंजान गेलो राट.
कसलो सडो आणि कसली रांगोळी,
उठाकच वाजतत आठ.

पाटो वरवंटो मागरात पडलोहा,
मिक्सरा तूच काय वाटूचा तां वाट.
घिरटी जाती गेली काळाआड,
आता गिरणी सतराशे साठ.

व्हायन-मुसाळ लग्नापुरताच,
तावंय्  भाड्यान्  देता भट.
हातात आमच्या कायच रव्हाक नाय,
पण तेकाच म्हनतव "वट".

कधी टीवी, कधी मोबाइल,
पोरा घेवन बसतत नेट.
वर्षान कधीतरी होता त्येंची,
रानावना वांगडा भेट.



"गावपण" इसरान आम्ही
घातलव विकासाचो घाट.
पायार धोंडो मारून सोताच्या,
लावलव सगळी वाट.
खय नेउन ठेवलंय कोकणांक मी ?

No comments:

Post a Comment