Sunday, 21 December 2014

Resignation

साल्याने पेपर टाकलाय.......


इंजिनिअरी मध्ये राजीनामा देणे, 
या क्रियेला पेपर टाकणे असे म्हणतात, 
त्यावर हि कविता.
 
साल्याने पेपर टाकलाय...................

 
तो रोज ऑफिसला  येतो
वेळेत येतो; वेळेत जातो

नऊ तास भरले नाहीत; 
तर चिंता करतो  

कमी भरले तास; 
तर नंतर भरून काढतो

साहेबाने काम दिले; 
तर नाश्त्याला पण जात नाही

साहेब जागेवर असताना; 
जागचा उठत नाही

कितीपण महत्वाचे काम असो; 
साहेब गायब झाल्याशिवाय 
हा जागचा हालत नाही  



साहेब खुर्चीत यायच्या आत, 
जागेवर यायची सवय काही जात नाही

जास्त सुट्या घेत नाही,  
घेतली तरी अप्रुव्हल घेतल्याशिवाय; 
कलटी टाकत नाही

ओव्हर टाइम कधी मागत नाही  
कॉम्प-ऑफ कधी घेत नाही.

मोबाईल वर फोन आला; 
तर साहेबासमोर बोलत नाही  
लँडलाईनचा वापर साहेबासमोर करत नाही  

साहेबाची नजर चुकवून; 
एक्सेल मध्ये गेम खेळत नाही  
आणि काम संपवले तरी; 
टाईमपास करत नाही

तक्रार न करता; 
साहेब टाकेल तेवढे काम करतो  
सरकारी रिपोर्ट पण  
मागीतल्या मागीतल्या बनवतो  

टीम मेंबर आला नाही; 
तर त्याची पण हमाली करतो  
काम संपले तरी; 
भूरसटलेली ट्रेनिंग करत बसतो

इतका बिचारा साहेबाला घाबरतो.................


कालपासून एकदम; 
बदलला आहे  
उशिरा येऊन 
लवकर जायला लागला आहे



न सांगताच सारखा 
फिरायला लागला आहे
नेमका पाहिजे तेंव्हा 
गायब व्हायला लागला आहे


साहेबाने काम दिले 
तर "आय विल ट्राय" म्हणतोय
कुणाचा फोन आला 
तर निवांत आहे म्हणतोय..... 


मित्राला फोन करून; 
चहा मारू म्हणतोय
"प्रोजेक्ट माझा जाम बोर आहे” 
असे बसल्या जागेवर म्हणतोय


साहेब जागेवर आला कि 
मुद्दाम उठून बाहेर जातोय
फोन वर "काही नाही रे 
टाईमपास चाललाय" म्हणतोय  

प्रत्येक मिटिंगला उशिरा येतोय
मधेच फोन आला 
तर बिनधास्त उठून जातोय 


त्याच्या प्रत्येक कृतीत 
"दिवारमधला" अमिताभ दिसतोय  
"खान चाचा अगले हप्ते और एक कुली 
हप्ता देनेसे इन्कार करेगा"

 असे सगळे वाटतेय
मला वाटले दोस्त आपला टेन्शनमधे बसलाय  

विचारले तर कळले 
साल्याने पेपर टाकलाय!!!!!!!!!!!!!!!!!!!!!


No comments:

Post a Comment