Amba
आंब्याची लज्जत न्यारी....
हापूस आंब्याची लज्जत न्यारी
एकदाच खाल्ला पण किमतीला भारी......१
पायरी आंबा गोडच गोड
खावी त्याची निदान एक तरी फोड......२
नावाने जरी आंबा लंगडा
तरी तब्येतीने आहे चांगलाच तगडा....३
कच्च्या आंब्याचा नखराच भारी
लोणचे त्याचे घरोघरी....४
दशेरी आंब्याला नाही तोड़
रस
त्याचा भारीच गोड....५
बेगमपल्लिने केली सर्वांवर ताण
गरीबाच्या घरी त्याचाच मान...६
चवीला पाणचट आंबा तोतापुरी
एकदाच खाला अन म्हणाल दहादा सॉरी...७
वटपौर्णिमेला रायवळ आंब्याचा मान
त्याविना अपुरे सुवासिनिचे वाण....८
संपला आंब्याचा मोसम जरी
नीलम दिसतो घरोघरी......९
आंब्याच्या रसाला पंचपक्वान्नाचा
मान
चांदीच्या वाटीत त्याचे स्थान....१०
आंब्याच्या फळाला राजाचा मान
सगळी फळे करती त्यालाच सलाम....११
आंब्याच्या आहेत हजारो जाती
कोकीळ पक्षी त्याचेच गुण गाती ....१२
संपले आमचे आंब्याचे गाणे
पण त्याआधी घ्या थंडगार पन्हे....१३
No comments:
Post a Comment