Friday, 24 October 2014

Aai

Aai


"आई"..."आई"..."आई"...असते...
देऊळ नसते...
देव नसते...
दुधावरली साय नसते...
फुल नसते...
चंद्र, तारा, वारा, चांदण्या, आकाश नसते...
अथांग अथांग सागर नसते...
"आई"...म्हणजे नक्की काय...?




कोणीही सांगू शकणार नाही...
पण तरीही मला वाटते...
"आई"... म्हणजे तीच्या मुलाला...
या जगात तुच " सर्वश्रेष्ठ " आहेस...
असा आत्मविश्वास देणारी...
एक महान...प्रेमळ...व्यक्ती...असते !!!
"आई"..."आईच"...असते...!!!!
- - -
सकाळी सकाळी धपाटे घालुन उठवते.. ती असते
आई
उठल्या उठल्या आवडीचा नाश्ता बनवून देते..
ती असते आई
नाश्ता संपवायच्या आत डब्याची काळजी करते..
ती असते आई



काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ
काही आवडीचे करून देते.. ती असते आई
साडीला हात पुसत व्यवस्थित जा म्हणते..
ती असते आई
परतण्याची आतुरतेने वाट बघत बसते.. ती असते
आई
आपण झोपेपर्यंत सतत जागी राहते.. ती असते आई
आणि जिच्याशिवाय आपल संपूर्ण आयुष्यच
अपूर्ण असते ..
ती असते आई..!
ती असते आई..!

No comments:

Post a Comment