Foetus (Garbha)
!! गर्भ !!
किती मंद तो प्रकाष तुझ्या गर्भा मधे होता
स्वर्गातला तो काळ माझ्या भोवताली होता
स्वर्गातला तो काळ माझ्या भोवताली होता
एकटाच मी अन माझ जग तूच होती
या भयाण जगा पासून मला लपवून तू होती
या भयाण जगा पासून मला लपवून तू होती
तुझ्या हृदयाचा आवाज किती मधुर तो होता
तुझ्या प्रत्येक स्पन्द्नावर माझा छोटा जीव होता
तुझ्या प्रत्येक स्पन्द्नावर माझा छोटा जीव होता
तुला मला जोडणारी एक कोमल दोर आत होती
तुझी नाळ ती जणू वेल मला लपटलेली
तुझी नाळ ती जणू वेल मला लपटलेली
तुझा आवाज येता ओठ माझे हसायचे
कान माझे फक्त तुझ्या आवाजाला तरसायचे
कान माझे फक्त तुझ्या आवाजाला तरसायचे
माझ्या साठी तू स्वतःला किती किती जपायाची
एक मी जगवो म्हणुनी किती किती तू मरायाचि
एक मी जगवो म्हणुनी किती किती तू मरायाचि
जन्म मला देताना किती सोसले तू त्रास
पण मी जगावो फक्त हाच तुझा ध्यास
पण मी जगावो फक्त हाच तुझा ध्यास
गर्भातले ते महिने पुन्हा येणार नाही
पण मी आई तुझ्या शिवाय जगू शकणारच नाही
पण मी आई तुझ्या शिवाय जगू शकणारच नाही
आज सुध्धा ती नाळ आपल्याला जोडून आहे
आज सुध्धा मी तसाच तुझ्या गर्भातच आहे
आज सुध्धा मी तसाच तुझ्या गर्भातच आहे
No comments:
Post a Comment