Friday, 3 October 2014

Vahiche Shevatche Pan

Vahiche Shevatche Pan

 
वहीचे शेवटचे पान
पहिल्या पानापेक्षा निराळे असते.

या दोन पानांत
मैलाचे अंतर असते.

पहिले पान देखाव्याचे
किती किती सोवळे.

शेवटला देखावा नाही मनाने पण मोकळे.

पहिल्यावर एक सुटसुटीत नाव
एकच पत्ता एकच गाव



शेवटचे पान? कोणाचेही पत्ते, कोणाचीही नावे
शेवटच्या पानाची अनेक गावे.

पहिले कोरे, पांढरे फटफटीत शेवटचे रंगीत तेवढेच टवटवीत.

पहिल्याचा तोरा, भारी डौल नाही कळायचे शेवटाचे मोल.

शेवटच्या पानाला उभ्या, आडव्या, तिरक्या रेघोट्या विविध आकृतींच्या अनेक राहुट्या. कुणीही यावे लिहून जावे आपले नाव ठेवून जावे शेवटच्या पानाने ते जपावे||



मध्येच फुल मध्येच पान कुणीही दावी आपली शान

राग नाही, लोभ नाही सगळेच कसे सम समान कुणाचे काहीही होवो,....... माझे मात्र एक व्हावे होता आले तर माझे जीवन शेवटचे पान व्हावे.........

No comments:

Post a Comment