Saturday 7 June 2014

Garva ani Maaj

Garva ani Maaj

चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत
बसलेले
असता ...
अवती भोवती पाहता हळूच
चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात
येते,,
अरेच्या! साखरच
घालायला विसरलो कि काय...
...
पुन्हा जाऊन साखर
घालायचा कंटाळा आलेले
तुम्ही कसाबसा तो कडू
चहा संपवता आणि नजरेस
पडते ती, कपाच्या तळाशी बसलेली न
,विरघळलेली साखर....
...



आयुष्य असच असतं...
सुखाचे क्षण तुमच्या अवती भोवतीच
असतात,
त्यांच्याकडे जरा डोळसपणे
बघायला शिकले पाहिजे......
एखाद़याशी हसता हसता तितक्याच
हक्कान
रुसता आल पाहीजे...
समोरच्याच्या डोळ्यातल
पाणी अलगद
पुसता आल पाहीजे...
मान-अपमान मैत्रीत काहीच नसत...
आपल्याला फक्त
समोरच्याच्या ह्रदयात
राहता आल पाहिजे..!!!
शब्दांना भावरूप देते,
. . . तेच खरे पत्र ॥
नात्यांना जोडून ठेवते,
तेच खरे गोत्र ॥
नजरे पल्याड पाहू शकतात तेच,
खरे नेत्र ॥
दूर असूनही दुरावत नाही,
तेच खरे मित्र.!!!!!!!!!!!




 एका डॉक्टरला ऑपरेशन साठी कॉल
आला... खुप
घाई करून
तो डॉक्टर हॉस्पिटल मध्ये
पोहोचला... त्याने
पटकन
सगळ्या नर्स
ऑपरेशनची तयारी करण्यास
सांगितले,
स्वतःचे कपडे बदलले, आणि पटकन
ऑपरेशन
थिएटर जवळ
आला...
तिथे त्याने पाहिले की एका मुलाचे
वडील हॉल
बाहेर रागात
चकरा मारताय आणि डॉक्टर ची वाट
पाहताय...
डॉक्टरांना पाहताच
त्या मुलाच्या वडिलाचा पारा चढला व
ते
रागातच डॉक्टर ला म्हणाले
"तुम्ही इथे
यायला इतका वेल
का घेतला? तुम्हाला कळत
नाही का माझ्या मुलाचे प्राण
धोक्यात आहे ते?
तुम्हाला काही जबाबदारी ची जाणिव
आहे
की नाही?"
यावर डॉक्टर स्मितहास्य देत
म्हणाला "मला माफ करा,
मी हॉस्पीटल मध्ये नव्हतो, मी फोन
आल्यानंतर
जितक्या लवकर येता आले
तितक्या लवकर आलो,
आणि आता मी प्रार्थना करतो की तुम्ही शांत
व्हा..
मला माझ काम करू द्या"
"शांत व्हा?? जर
तुमचा मुलगा आता ऑपरेशन
थिएटर मध्ये
असता तर?? जर
तुमचा स्वतःचा मुलगा आता मृत्यु
च्या जबड्यात असता तर तुम्ही काय
केल
असतं??" वडील
रागात म्हणाले...
डॉक्टर पुन्हा एकदा स्मितहास्य देत
म्हणाले
"मी तेच
सांगतो जे पवित्र पुस्तकांमध्ये
लिहिलेले आहे
की हे शरीर
नश्वर आहे, शरीर मातीतुन तयार झाल
आणि शेवटी मातीतच
मिसळणार, अगदी आम्ही डॉक्टर
जरी असलो तरी आम्ही काय देव नाही..
आता तुम्ही शांत
व्हा आणि देवा जवळ प्रार्थना करा...
मी माझे
पुर्ण प्रयत्न
करतो..."
आणि असे म्हणत डॉक्टर ऑपरेशन थिएटर
मध्ये
गेला तसे
वडिल त्या डॉक्टरकडे रागातच पहात
राहिले
आणि काही तासांनंतर डॉक्टर आनंदात
बाहेर
आले
आणि त्या मुलाच्या वडिलांना म्हणाले
"अभिनंदन ऑपरेशन यशस्वी झालं...
आम्ही तुमच्या मुलाला वाचावल"
त्यावर मुलाच्या वडिलांचा आनंद
गगनात
मावेनासा झाला...
ते डॉक्टर ना धन्यवाद म्हणाले..
डॉक्टरांनी त्याना काहीही प्रतिक्रीया दिली नाही आणी ते
तसेच तिथुन ताडकन निघुन गेले...
यावर मग वडिलांना आश्चर्य
झाला आणि ते
शेजारी उभ्या असलेल्या नर्स
ला रागात
म्हणाले
"किती गर्विष्ठ आणि माजोरा आहे
हा डॉक्टर"
त्यावर ती नर्स रडत
म्हणाली "त्या डॉक्टरांचा मुलगा काल
अपघातात वारला... आज ते
त्याचा अंतिम
संस्कार करत होते
जेव्हा आम्ही त्यांना तुमच्या मुलाच्या ऑपरेशन
साठी फोन
केला... आणि ते स्वतःच्या मुलाचा अंतिम
संस्कार अर्धवट
सोडुन घाईने तुमच्या मुलाच्या ऑपरेशन
साठी आले
आणि आता अंतिम संस्कार पुर्ण
करण्यासाठि पटकन गेले...
अहो ज्यांचा स्वतःचा एकुलता एक
मुलगा मेला तो काय गर्व
आणि माज करणार"
हे ऐकुन त्याच्ये वडिल सन्न झाले..
आणि त्यांना खुप
पश्चाताप झाला...
सबक- कधीच कुणाबद्दल काहीही बोलुन
मोकळे
होउ नये
कारण तुम्हाला नसतं माहित त्याने
काय
भोगलय...

No comments:

Post a Comment