Thursday, 28 May 2015

Konkan Miss Karto

Konkan Miss Karto 


दूरवर रवान गावच्या घराची खरी किंमत कळता.
आठवण इली काय आपोआप
डोळ्यात्सून पाणी गळता.

"इम्पोर्टेड " ब्लान्केटात थंडी तर नसता
पण "फाटक्या " गोडधेच्या मायेची
कमी नक्कीच भासता,



मार्बलच्या टाइलस वर
सुळसुळीत तर वाटता
पण शेणान सारवलेल्या
जमिनिचो सुगंध थय नसता,

सकाळच्या नाष्ट्यात  ब्रेड बटर खातो,
पन उकड्या तांदळाची पेज आणि वाली भाजेयची मजा काय औरच आसता.

दुपारचा जेवण लंचला पुलाव आणि 
रात्री जेवण डिनरला बिरयानि आसता.
पन चुलिवरच्या माशाच्या कडयेची, चुलित भाजलेल्या सुक्या बांगडयाची 
चव आणि मजा कायच्या काय आसता.

खारवलेले काजू आम्ही
"ड्राई फ्रुट " म्हनान खातो
चुलीत भाजलेल्या काजीन्चो
डिक मिस करतो



५०० रुपायक हापूसचे
१२ आंबे इकत घेतो
पन धोंडे, गुणे मारून पाडलेल्या
आंब्यांची मजा मिस करतो,

२५ / ५० रू फणसाचे गरे किलोन घेतो पन पाटल्या दारत बसान खालेल्या काप्या, रसाळ फणसाची
मजा काय औरच आसता.

कमोड मध्ये बसान आम्ही
पेपर आरामात वाचतो,
पण नदीर, होळार जावची 
मजा काय औरच आसता.

एसी मध्ये बसान आम्ही
थंड्शीर हवा घेतो
पण गावाची वडा, पिपळा खालची
हवा खाण्यासाठी येडेपिशे होतो

लांब रवान सुद्धा कोकणी आम्ही जपतो 
पण खऱ्याखुऱ्या कोकणाक
खूप्पच मिस करतो 
पण खऱ्याखुऱ्या कोकणाक
खूप्पच मिस करतो

No comments:

Post a Comment