Sunday, 11 May 2014

Happy Mother's Day

Happy Mother's Day


जगी माऊली सारखे कोण आहे ।
जिचे जन्मजन्मांतरी ऋण आहे।।
असे ऋण हे की जया व्याज नाही।
ऋणाविन त्या जीवना साज नाही ।।
जिने सोसल्या यातना कोटी कोटी ।
तुला जन्म लाभे तिच्या पुण्य पोटी।।



जिच्या यातनाचे जगी मोल नाही ।
तिच्या सारखा लाघवी बोल नाही।।
जिने लाविला लेकरांना लळा या।
तिच्या दैवी लेखी उन्हाळी झळा या ।।
जिच्या पूजनाला जगी फूल नाही ।
अशा देवतेचे जगी नाव आई||
"...स्वामी तीन्ही जगांचा.. आई विना भिकारी...". "आ " म्हणजे ’आत्मा’. " ई " म्हणजे " ईश्वर "(परमात्मा)... आत्मा व परमात्मा यांचे एकरुप... ती ’ आई ’...
जागतिक मातृदिनानिमित शुभेच्छा ||

 ------------------------------------------------------------




॥आई॥
घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही
जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत नाही ,
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात,
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात....!
"मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा".

No comments:

Post a Comment