Tuesday 29 April 2014

Prem---Marathi kavita

Prem---Marathi kavita



प्रेम कुणावरही करू नये!

आपण आपलं मस्तीत जगावं
हॉटेलात जावं.. खावं - प्यावं...पोरींचं बिल उगाच भरू नये;प्रेम कुणावरही करू नये!प्रेम म्हणजे
एक अजब गेम असते
जिच्यासाठी आपण धडपडतो
...
तडफडतो


 
ती चक्क
दुसऱ्याची डेम असते
सत्य ध्यानी आल्यावर
फुक्कटचं झुरू नये;प्रेम कुणावर करू नये!म्हणे-प्रेम म्हणजे
एक पवित्र नातं असतं!अहो, कसचं काय!प्रेम म्हणजे
एक विचित्र जातं असतं...दळणारं आंधळं
दळदळ दळत असतं
आणि पीठ मात्र
भलतचं कुत्र खात असतं
आपण दळलेल्या पिठावर
ऐऱ्यागैऱ्याने चरू नये;म्हणून आपणच
प्रेम कुणावर करू नये!चेहऱ्यावरचं चांदणं तिच्या
कितीही दुधाळ असलं,गुलुगुलू बोलणं तिचं
कितीही मधाळ असलं,तरी...शहाण्यानं मधमाशी
हातात धरू नये;प्रेम कुणावरही करू नये!


No comments:

Post a Comment