Bayko
बायकोच्या मनात काय आहे
ते कुठल्या नव-याला
कधी कळल आहे का?
ते कुठल्या नव-याला
कधी कळल आहे का?
पण नव-याच्या मनात
काय आहे ते प्रत्येक
बायकोला मात्र कळत
काय आहे ते प्रत्येक
बायकोला मात्र कळत
येणा-या रविवारी
नव-याला माहित नसत
तो काय करणार आहे
पण बायकोला मात्र
सगळा प्रोग्राम माहित असतो
नव-याला माहित नसत
तो काय करणार आहे
पण बायकोला मात्र
सगळा प्रोग्राम माहित असतो
बायको म्हणजे
नव-याची पर्सनल
डायरीच असते
कधी काय हव, काय नको
कोणाचा वाढदिवस आहे,
कोणाच लग्न आहे ,
सगळ तिच्या डोक्यात
'सेव' केलेल असत
ते सुध्दा 'रिमांइडर सकट'
नव-याची पर्सनल
डायरीच असते
कधी काय हव, काय नको
कोणाचा वाढदिवस आहे,
कोणाच लग्न आहे ,
सगळ तिच्या डोक्यात
'सेव' केलेल असत
ते सुध्दा 'रिमांइडर सकट'
चोराची प्रत्येक चाल जशी
पोलिसाला कळते,
तस नव-याची बायकोला.
तिच्या कड़े सर्व पुरावे असतात.
पण जो पर्यंत नवरा काही
बोलत नाही, तो पर्यंत
बायकोमात्र गप्प असते.
एकदा का सापडलात
कि मग मात्र तुमची ख़ैर नसते.
पोलिसाला कळते,
तस नव-याची बायकोला.
तिच्या कड़े सर्व पुरावे असतात.
पण जो पर्यंत नवरा काही
बोलत नाही, तो पर्यंत
बायकोमात्र गप्प असते.
एकदा का सापडलात
कि मग मात्र तुमची ख़ैर नसते.
हवामान खात्यापेक्षा
बायको दोन पावल पुढेच असते.
नव-याच्या चेह-यावरूनच
तिला भूतकाळ, वर्तमान, भविष्यकाळ
सगळ्याची कल्पना येते.
हो , आणी येणा-या प्रसंगासाठी
बाई अगोदरच सज्ज असते.
बायको दोन पावल पुढेच असते.
नव-याच्या चेह-यावरूनच
तिला भूतकाळ, वर्तमान, भविष्यकाळ
सगळ्याची कल्पना येते.
हो , आणी येणा-या प्रसंगासाठी
बाई अगोदरच सज्ज असते.
कधी नव-याला प्रेमाने गोंजारायच,
आणी कधी दम द्यायचा,
तर कधी अश्रुंच ब्रम्हाअस्त्र काढायच
हे ती जस अभिमन्यु
आईच्या पोटी चक्रव्युह भेदायला शिकला,
तस तिही शिकलेली असते.
आणी कधी दम द्यायचा,
तर कधी अश्रुंच ब्रम्हाअस्त्र काढायच
हे ती जस अभिमन्यु
आईच्या पोटी चक्रव्युह भेदायला शिकला,
तस तिही शिकलेली असते.
पण बायको असते
म्हणून प्रत्येक नवरा
संसाराचा गाढा ओढत असतो.
बायको म्हणजे संसाररुपी शरीराच
ह्रदय असते, ती जोपर्यंत
असते तोपर्यंत संसार,
'संसार' असतो
जवळ असली की वसंत फुलतो,
दुर असली कि शिशीर बोचतो.
म्हणून प्रत्येक नवरा
संसाराचा गाढा ओढत असतो.
बायको म्हणजे संसाररुपी शरीराच
ह्रदय असते, ती जोपर्यंत
असते तोपर्यंत संसार,
'संसार' असतो
जवळ असली की वसंत फुलतो,
दुर असली कि शिशीर बोचतो.
वेळ प्रसंगी नव-याला
फुलाप्रमाणे जपते,
समईतल्या वाती सारखी
नव-यासाठी जळते,
संकटामध्ये कधी दुर्गा होते,
तर मुलांनसाठी सरस्वती होते,
घरच्यांसाठी अन्नपूर्णा होते,
लक्ष्मी होऊन तीळ तीळ पैसा जमवते.
शेवटी यमालाही परत फिरायला
भाग पाडणारी बायकोच असते।
फुलाप्रमाणे जपते,
समईतल्या वाती सारखी
नव-यासाठी जळते,
संकटामध्ये कधी दुर्गा होते,
तर मुलांनसाठी सरस्वती होते,
घरच्यांसाठी अन्नपूर्णा होते,
लक्ष्मी होऊन तीळ तीळ पैसा जमवते.
शेवटी यमालाही परत फिरायला
भाग पाडणारी बायकोच असते।