Bhandan He Whailach Hava
गोडी गुलाबीच्या संसाराला,
नेहमी नेहमी अर्थ नाही,
भांडण तर व्हायलाच हवं,
त्याशिवाय संसारात मज्जा नाही !
व्हायला हवाच अबोला,
एकमेकांवर रुसून,
फिरवलंच पाहीजे तोंड,
एकाच सोफ्यावर बसून..
व्हायला हवा वाद,
गलथानपणा करुन,
व्हायलाच हवा विसंवाद,
फिरायला जाण्यावरुन,
बारीकसारीक
खटके असे,
उडायलाच हवेत ..
रुसवा घालवायला मग तो,
घेईलच की कवेत !!
संसाराला हवीच की हो,
तिखट मिठाची गोडी,
प्रेमही हवं तितकंच..
की आपोआप विझते काडी.
खूप खूप भांडल्यावर,
व्हायला हवा त्रास ..
आणि नकळत वाटायला हवी,
एकमेकांची आस !!!
कितीही झालं भांडण तरी,
टोक गाठायचं नाही..
एकमेकात सामावताना,
अढी ठेवायची
नाही...
हे नातंच किती छान,
असं सजायलाच हवं..
गोडी गुलाबीच्या संसारात,
भांडण हे व्हायलाच हवं......