Mazha Gao - Malvani Kavita
पांदणीतून चलताना पतेरयाचो आवाज येता,
शरात काय राम नाय गावच माझा बरा होता !!
खडखडे लाडू, गिलासात चाय,
गावचा भांडाण नाक्यावरच
न्याय !
पिड्याची गाडी ढोरामागे जाय,
झाड्याक झाला की नदीकडे पाय !
पावसाच्या हौराचा पाणी माझ्या खळ्यात येता,
शरात काय राम नाय गावच माझा बरा होता !!
ताटातल्या भाताक माशाचो वास,
घशाखाली उतारता सूकोच घास
!
औशीन आठावल्यान की बाबल्याक ढास,
गुरांच्या गोठ्यात शेनाचो वास !
आजयेच्या गोधडीक प्रेमाची उब येता,
शरात काय राम नाय गावच माझा बरा होता !!
र्हाटाचा पाणी, म्हशीची धार,
शाळेक दांडी, मास्तरांचो मार !
एसटी ची गाडी, आठवड्याचो बाजार,
पायात नाय चप्पल, डोक्यावर भार !
ओसरीवर पडल्या पडल्या माका छान झोप लागता,
शरात काय राम नाय गावच माझा बरा होता !!
फाटफटीच होता कोंबड्याची बांग,
देवळातलो धयकालो, भजनाची झांज !
रवळनाथाची पालखी, सातेरीचो मांड,
डुकराच्या शिकारीक ऊठवतत रान!
गूरवाचा गाराणा माका देवाकडे नेता,
शरात काय राम नाय गावच माझा बरा होता !!
पांदणीतून चलताना पतेरयाचो आवाज येता,
शरात काय राम नाय गावच माझा बरा होता
!!
No comments:
Post a Comment