Friday, 3 October 2014

Sagla Tuzhya Navacha.....

Sagla Tuzhya Navacha.....

विचार करायला लावणारा ,
ह्रदयाला भिडवणारा.......
तिचा फक्त एकच प्रश्न .......
देह माझा ,
हळद तुझ्या नावाची .
हात माझा ,
मेहंदी तुझ्या नावाची .



भांग माझा ,
सिंदूर तुझ्या नावाचा .
माथा माझा ,
बिंदिया तुझ्या नावाची .
नाक माझे ,
नथ तुझ्या नावाची .
गळा माझा ,
मंगळसूत्र तुझ्या नावाचे .
मनगट माझे ,
(बांगड्या) चुडा तुझ्या नावाच्या .
पाय माझे ,
जोडवी तुझ्या नावाची .
आणि हो.....
वडीलधा-यांच्या
पाया मी पडते ,
आणि ......
अखंड सौभाग्यवती भव ।
आशिर्वाद मात्र तुला.



वटपौर्णिमेचे व्रत माझे ,
आयुष्याचे वरदान तुला .
घराची काळजी घ्यायची मी,
दरवाजावर नावाची प्लेट तुझी.
नाव माझे ,
पण त्यापुढे ऒळख तुझी .
इतकच काय .......
ऊदर माझे ,
रक्त माझे ,
दूध माझे,
आणि मुलं ?
मुलं तुझ्या नावाची .
माझं सगळच तर,
तुझ्या नावाचं......
तक्रार नाही ...
प्लिज रागाऊही नकोस,
अत्यंत नम्रपणे
एक प्रश्न विचारतेय..
एवढच सांग.....
तुझ्याकडे  काय आहे का रे,
माझ्या नावाचं ?

No comments:

Post a Comment