Monday, 26 October 2015

स्वर्ग

स्वर्ग


पहायचा असेल भूवरी स्वर्ग,
त्वरीत गाठावा जिल्हा सिंधुदुर्ग
कोकणी मातीचा हिरवा रम्य निसर्ग,
हाच सिंधुदुर्गाचा अभिमान गर्व...

देवगडचा कुणकेश्वर प्रति काशी,
महाशिवरात्रीला भेट होई शंकराशी
म्हणतात याला कोकणची काशी,
स्वर्गातून आणलीय जशीच्या तशी...



कुडाळ तालुक्यात माणगांव धन्य,
तेथे जन्मले दत्तावतारी वासुदेवानंद,
ब्रम्हविद्या यक्षिणीची कृपा लय थोर,
भक्ती - शक्तीचा महिमा अपरंपार .....

मालवणचा किल्ला सिंधुदुर्ग,
अख्या सिंधुदुर्गाचा गर्व
शेकडो वर्षापूर्वी संपले राजेशाही पर्व,
तरी समुद्राच्या मध्ये आहे हा दुर्ग....

सावंतवाडीची लाकडी खेळणी,
यंत्रयुगातही आहे मुलांसाठी पर्वणी
खेळणी हवी आहेत लाकडी,
तर ताबडतोब गाठा सावंतवाडी...

फळांचा राजा देवगडचा "हापूस",
आज बनलाय सर्व फळांचा "बापूस"
हापूस आंबा एकदा पहा खाऊन,
चार पाच पेटी मागवाल मागाहून....



सिंधुदुर्गातील मालवणी भाषा,
हि ऐकताच सर्वत्र पिकतो हशा,
सिनेमातून गेला तमाशा,
मात्र नाटकात आली मालवणी भाषा...

सिंधुदुर्गातील पोखरबावचा गणपती,
पांडवांची होती येथे एक रात्र वस्ती
बारा मास वाहते येथे पाणी धबा धबा, 
फुलल्यात येथे  त-हेत-हेच्या बागा...

असेच एक शिरोडा ठिकाण,
आहे येथे मिठाची खाण,
सिंधुदुर्गाला मीठ पुरवते जाण,
रेडीचा गणपती येथील शान....

आच-याचा रामेश्वर, 
नवसाचा परमेश्वर, 
मानतात बडे बडे श्रीमंत, 
यालाच आपला भगवंत...
येवा कोकण आपलोच आसा...

No comments:

Post a Comment