हाफ सेंच्यूरी
मध्य बिंदु आला आयुष्याचा
हाफ सेंच्यूरी हा शतायुषीचा
ना इकडचे राहीलो ना तिकडचे
ना जवान ना वृद्धावस्थे कडचे
काही झालेत थोडे स्थूल, काही लठ्ठे
काही मात्र आहेत टुणटुणीत पठ्ठे
काहिंची पिल्लं गेली घरटे सोडून
काहीं अजून काढतात रात्र
जागून
लागले कोणास चश्मे, कोणाला कवळ्या
कोणा कोणाला बीपी शुगरच्या गोळ्या
चेहऱ्यावर दिसू लागल्या महीन सुरकुत्या
त्या लपवण्यास करतो अतोनात खटपट्या
आता लवकरच गुडघे दुखू लागतील
काहींच्या डोळ्यात कॅटरॅक्ट पण होतील
लागेल कार्डीयाक बायपास काहींना
नी जॅाइन्ट हिप जॅाइन्ट रिप्लेस बाकींना
काहींना
अलझायमर्स...किंवा डिमॅनशीया
बऱ्याच जणांना इनसॅामनीया वा अॅमनेशीया
सुरू होण्या पूर्वी ही शरीराची पूरती घसरण
प्लीज एन्जोय करा आयुष्याचा क्षणोन-क्षण
छंद जोपासा..मित्र बनवा..जग सारे फिरून घ्या...
काम तर आहेच हो...स्वत:ला पण थोडा वेळ द्या...
हाफ सेंच्युयरी आलीय...स्वत:ला पण थोडा वेळ द्या.
No comments:
Post a Comment