तुलना
आई बाबा अशी तुलना
मुळीच मला मान्य नाही .
जो तो आहे आपल्या जागी
त्यांना वेगळ तोलणं योग्य नाही .
मातृ पितृ देवो भव
सारे म्हणतोना आपण
मग देवांमध्ये उगाच का ?
करतो आपण असे विभाजन .
केले चिंतन कितीही मंथन
निष्पन्न काही होणार नाही .
आई बाबा अशी तुलना
मुळीच मला मान्य
नाही .
दोघेच मुलांना जन्म देतात
संस्कारही तेच करतात .
ताठ मानेने जगण्याचे
पंखात बळ तेच भरतात.
अपार कष्ट दोघांचेही
आपण का मानीत नाही .
आई बाबा अशी तुलना
मुळीच मला मान्य नाही .
एक हात रागावणारा
दुसरा डोळे पुसणारा .
ठेच लागून धडपडताना
एक हात सावरणारा .
कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ
कोणी लहान मोठे
नाही .
आई बाबा अशी तुलना
मला मुळीच मान्य नाही .
आई बाबांवर एकत्र कविता
कधी कुणी लिहिली का ?
आई बाबांवर एकत्र गाणं
कधी कोणी गायलंय का ?
कोण जाणे कवीनाही
लिहावेसे का वाटत नाही .
आई बाबा अशी तुलना
मुळीच मला मान्य नाही .
दोघांनाही एकत्र लिहावे
कविता अथवा गाण्यांमधूनी
महती त्यांची द्विगुणीत
होईल
नव्या वेगळ्या सुरांमधुनी.
तीच भाषा अन तेच शब्द ही
फरक आणखी काही नाही .
आई बाबा अशी तुलना
मुळीच मला मान्य नाही .
एकाच नाण्याच्या बाजू दोन
दोन शरिरे एक मंन
आपणच त्यांना वेगळं करतो
शब्दांमधून वेगळं तोलतो .
आई महान की बाप महान
कवितेमधून मायने भरतो .
कोणी किती काही लिहो
श्रेष्ठत्व कुणाचे ढळत नाही
.
आई बाबा अशी तुलना
मुळीच मला मान्य नाही .
आई आईपण पेलते
बाप बापपण पेलतो .
कुणीच कुठे कमी नाही .
इवल्या इवल्या चिमण्यांना
त्यांच्याशिवाय जग नाही .
आईच्या हातांमध्ये
बळ असते बाबांचे .
बाबांच्या हृदयामध्ये
मंन असते आईचे .
एकमेकांशिवाय त्यांचे जगणं
बुद्धिलाच कुणाच्या पटणार नाही .
आई बाबा
अशी तुलना
मुळीच मला मान्य नाही .
जो तो आहे आपल्या जागी
त्यांना वेगळं तोलण योग्य नाही .
No comments:
Post a Comment